corona

बीड जिल्हा : 151 कोरोना पॉझिटिव्ह; मृत्यूसंख्या 300

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : कोरोनाचे स्वॅब अहवाल सोमवारी (दि.5) दुपारी प्राप्त झाले. एकूण 1011 अहवालांपैकी 151 पॉझिटिव्ह तर 860 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड जिल्ह्यातील कोरोनाची मृत्यूसंख्या 300 इतकी झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी ही माहिती दिली.

अंबाजोगाई तालुक्यात 15, आष्टी 15, बीड 57, धारूर 11, गेवराई 4, केज 8, माजलगाव 18, परळी 11, पाटोदा 3, शिरूर 4, वडवणी 5 असे एकूण 147 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या 10 हजारांवर गेलेली असली तरी तब्बल 8 हजारांपेक्षा जास्त लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यात 300 मृत्यूसंख्या ही जिल्हावासियांसाठी चिंताजनक बाब आहे.

Tagged