सभापतीपदी संभाजी शेजुळ तर उपसभापती लताताई लाटे बिनविरोध निवड

न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

माजलगाव बाजार समितीची निवड जाहिर

माजलगाव : बाजार समितीच्या सभापतीपदी संभाजी शिवाजीराव शेजुळ तर उपसभापतीपदी लताताई अच्युतराव लाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
      माजलगाव उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया आज दि.5 सोमवारी दुपारी 1 वाजता पार पडली. यात सभापतीपदी संभाजी शिवाजीराव शेजुळ तर उपसभापतीपदी लताताई अच्युतराव लाटे यांची एकमेव अर्ज दाखल झाल्याने, त्यांची सभापती व उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीसाठी अनेकांमध्ये रस्सीखेच सुरु होती.

Tagged