पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता; 25 तासापासून शोधकार्य सुरु

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

परळी तालुक्यातील चांदापूर येथील घटना

परळी  : तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता झाला. तलावात बुडाला असल्याचा संशय आल्याने तब्बल 25 तासापासून शोधकार्य सुरु आहे. मात्र अजुनही शोधकार्यात काहीच अढळून न आल्यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 
      शेख खाजामिया (रा.हबीबपुरा ता.परळी) हा तरुण परळी शहरापासून जवळच असलेल्या चांदापूर तलावामध्ये रविवारी सकाळी 11 च्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता. मात्र परत तो बाहेर आलाच नाही. त्यामुळे तलावात बुडला असल्याचा संशय नातेवाईकांना आला. त्यामुळे तलाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. याची माहिती महसुल प्रशासनाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल 25 तासापासून तरुणाचे शोधकार्य सुरु असून अजुनही काहीच आढळून आले नाही. त्यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी विविध विभागाच्या अधिकारी यांनी भेट दिली आहे.

घटनास्थळी अनेकांच्या भेटी
तलवामध्ये तरुण बुडाला असल्याची माहिती मिळताच महसूल प्रशासनाचे परळी उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार विपीन पाटील, पोनि.शिवलाल पुर्भे, ना.तहसिलदार बाबु रुपनर यांच्यासह धरण प्रशासन, पोलीस प्रशासन नगर पालिका प्रशासन, सामाजिक संस्था यांनी घटनास्थही धाव घेतली.



तीन पथकाकडून तपास सुरु
शोधकार्यासाठी पुणे येथून एनडीआरएफ पथक, बीड न.प.चे विशेष बचाव पथक व एक खाजगी पथक अशी तीन पथके तलावात ऑक्सिजनच्या मदतीने शोधकार्य करत आहेत. त्याच बरोबर परळी नगर पालिका, परळी ग्रामीण पोलीस, समाजिक संस्थाही शोधकार्यासाठी मदत करत आहेत.

Tagged