आष्टी डीवायएसपी यांची बीड तालुक्यात गुटख्यावर कारवाई!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

जिल्ह्यात कुणी कुठेही कारवाई करण्याचे आयजींचे होते आदेश
बीड दि. 4 : बीड येथे झालेल्या बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण (IG DNYANESHWAR CHAVHAN) यांनी डीवायएसपी (DYSP) यांनी जिल्ह्यात कुठेही कारवाई करावी, अशा सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने आष्टी विभागाचे उपअधीक्षक अभिजीत धराशिवकर यांनी बीड तालुक्यातील घोडका राजुरी शिवारात सोमवारी (दि.3) रात्री साठा केलेला गुटखा जप्त करत दोघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात (PIMPALNER POLICE STATION) तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी पिंपळनेर ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार उपनिरीक्षक पतंगे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांना मिळालेल्या माहितीवरून उपअधीक्षक धाराशिवकर यांनी कारवाईस पाठवले. बीड तालुक्यातील घोडका राजुरी शिवारात अशोक धोंडीराम डरपे यांच्या शेडमध्ये विविध प्रकारचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला 2 लाख 3 हजार 534 रुपयांचा गुटखा आढळून आला. हा गुटखा बाळासाहेब घुमरे (रा. मैंदा ता.बीड) याकडून घेतल्याचे सांगितले. या प्रकरणी दोघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डरपे अटक असून गुटखा माफिया घुमरे फरार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पतंगे, आगरकर, कोळेकर, पवार, कोळेकर यांनी केली.

(gutakha mafiya news), (pimpalner police station area)

Tagged