दोन चिमुकल्यासह मातेची आत्महत्या!

क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र

पैठण दि.४ : पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रांजणगाव दांडगा येथील चोवीस वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.4) सकाळी उघडकीस आहे.
पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रांजनगाव दांडगा येथील विवाहिता आयेशा शेखचा चार वर्षांपूर्वी शेख इरफान बूऱ्हाण सोबत विवाह झाला होता. आयेशाचा पती इरफान समवेत रांजणगाव येथे परिवारापासून वेगळे राहत होते. त्यांना अलीया (वय ३) तंजीला (वय ३ महीने) ही दोन अपत्ये होती. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून किरकोळ वाद झाला. परंतु वादाचे कारण अद्याप समजू शकले नाही. राग अनावर झाल्याने पती व अन्य कुटूंबीय बाहेरगावी गेल्याचे पाहुन ती कुणाला काही एक न सांगता बुधवारी दोन्ही मुलींना सोबत घेऊन शेतात गेली. तिने पायातील चप्पल व अंगावरील ओढणी विहीरीच्या काठावर ठेवून दोन्ही मुलींना सोबत घेऊन विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. घटनेची ही माहिती मिळताच ग्रामस्थ, नातेवाईक व पाचोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, जमादार गोरक्षनाथ कणसे, निवृत्ती मदने, पवन चव्हाण आदीनी घटनास्थळी धाव घेवून चिमुकली तंजीलाचा मृतदेह बाहेर काढला. मात्र उर्वरित मायलेकीचा गावांतील सर्व पोहणाऱ्यानी तळाशी बुडया घेऊन शोध मोहीम सुरू केले बुधवार रोजी रात्री उशिरा आयेशा व अलीया या दोघांचे मृतदेह सापडले. तिघींचे मृतदेह पाचोड पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तपासणीसाठी पाचोडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. गुरुवारी सकाळी सदरील तिने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी रुग्णालयाच्या परिसरात नातेवाइकांनी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची खबर मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे यांनी रुग्णालयात जाऊन नातेवाईक यांची भेट घेतली. पाचोड पोलिसात गुरुवारी रोजी दुपारपर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील महिलेचे माहेर पैठण तालुक्यातील नवगाव- तुळजापूर येथील आहे.

Tagged