MURDER

मुलबाळ होत नसल्याने पत्नीचा खून!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि. 6 : पत्नीला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत खून करण्यात आला. ही घटना बीड तालुक्यातील औरंगपूर येथे गुरुवारी घडली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राधा महादेव रेड्डे (वय 32 ) असे मयत महिलेचे नाव आहे. महादेव आसाराम रेड्डी असे आरोपीचे नाव असून दोघे बीड तालुक्यातील औरंगपूर येथील डरपे यांच्या शेतात सालगडी म्हणून मजुरी करत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचे निधन झाले. कुटुंब नियोजन झाल्यामुळे आता तुला मुलबाळ होणार नाही. मला मुलगा हवा आहे, त्यामुळे मी दुसरे लग्न करावे लागणार आहे. अस म्हणून महादेव हा राधाचा सतत मानसिक छळ करत होता. याच रागातुन त्याने लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून राधाचा खून केला. अशी फिर्याद राधाचा भाऊ सुनील बांगडे यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सपोनि. योगेश उबाळे करत आहेत.

Tagged