bibtya halla solewadi

बिबट्याचा पुन्हा हल्ला

आष्टी न्यूज ऑफ द डे बीड

आष्टी- आष्टी तालुक्यातील बिबट्याचा उपद्रव काही थांबता थांबत नाही. आज पुन्हा एकदा बिबट्याने सोलेवाडी येथे एका वृध्दावर हल्ला केला आहे. विकास विठोबा झगडे (वय 60) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृध्दाचे नाव आहे.
विकास झगडे हे जामगाव आणि आष्टी या दोन गावाच्या मध्ये असलेल्या सोलेवाडी येथे ज्वारीला पाणी देत होते. ते खाली वाकलेले असता बिबट्याने त्यांच्या कमरेवर झडप मारली. त्यात मांडी, उजवा हात, व कमरेला जखम झाली आहे. अशिष विकास झगडे हाही तिथेच होता. त्याने आरडा-ओरड करून बिबट्याला पळवून लावले. जखमीला आष्टीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tagged