हौसेला मोल नाही; 39 लाखांच्या गाडीला 34 लाखांची नंबर प्लेट!

देश विदेश न्यूज ऑफ द डे मनोरंजन

मुंबई : हौसेला मोल नाही या म्हणीला तंतोतंग लागू होईल अशीच घटना समोर आली आहे. अहमदाबादच्या एका व्यक्तीने 39 लाखांची चारचाकी गाडी खरेदी केली. त्या गाडीला 34 लाखांची नंबर प्लेट बसविली आहे.

अहमदाबादमध्ये आशिश पटेल या व्यक्तीने 39 लाख रूपये किंमतीची एसयूव्ही कार घेतली. ते जेम्स बॉन्डचे चाहते असल्यामुळे त्यांना बॉन्डचा 007 हा नंबर प्लेट हवा होता. यासाठी बोली लागली, तेव्हा 39 लाखांच्या गाडीसाठी पटेल यांनी 34 लाख रुपयांची नंबर प्लेट खरेदी केली. दरम्यान, गेल्या काही वर्षातील ही नंबर प्लेटसाठीची सर्वात मोठी रक्कम ठरली आहे.

Tagged