anil deshmukh

पोलीस दलात 12,538 जागांसाठी भरती

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

कोरोना काळात नोकर्‍या जात आहेत. बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता सतावत असताना, पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणार्‍या लोकांसाठी आनंदाची बाब समोर येत आहे.

डिसेंबर 2020 पर्यंत राज्य पोलीस दलांमध्ये विविध पदांवर 12 हजार 538 कर्मचार्‍यांची भर्ती केली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरवर दिली आहे.

गृहमंत्र्यांनी या संदर्भात शुक्रवारी गृह विभागासाठीचे अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासह घेतलेल्या उच्चस्तरीय अधिकार्‍यांच्या बैठकीत या वर्षअखेरपर्यंत पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे,पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Tagged