antigen test swab

बीडमध्ये पुन्हा 137 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.9 : बीडमध्ये रविवारी केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 137 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज दिवसभरात 3170 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या.

त्यात बलभीम केंद्रावर 540 पैकी17 पॉझिटिव्ह, वैष्णवीमध्ये 460 पैकी 16, अशोक नगर शाळेत 624 पैकी 31, राजस्थानी विद्यालय 556 पैकी 31, चंपावती बुथ 1 वर 512 पैकी 22, चंपावती बुथ 2 वर 478 पैकी 20 पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
कालही अ‍ॅन्टीजन टेस्टच्या तपासणीत 86 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर आजच्या टेस्टमध्ये 137 असे मिळून 223 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यामुळे बीड शहरात रविवारी रात्री साडे आठ वाजेपर्यंत 1722 रुग्णसंख्या झालेली आहे. त्यात 49 जणांचा मृत्यू झालेला असून 714 जण बरे झालेले आहेत. आज आढळलेले 137 रुग्ण गृहीत धरून आता बीड जिल्ह्यात 959 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged