khun

गुप्तांगाजवळ चाकूने भोकसले

केज क्राईम न्यूज ऑफ द डे

तुकुचीवाडी येथील घटना.
चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

केज, दि.25 : बैल पोळ्याच्या दिवशी गावात बैल का आणले? या कारणावरुन केज तालुक्यातील तुकुचीवाडी येथे एका 35 वर्षीय इसमाला गुप्तांगाच्या नाजूक जागी धारदार चाकूने भोकसून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि.19 ऑगस्ट रोजी नामदेव पंढरी चौरे वय (35 वर्ष) यास अशोक संपती चौरे, बालासाहेब रघुनाथ चौरे, अंकुश रामराव चौरे, महिपती रघुनाथ चौरे या चौघानी त्याच्या घरा समोर जाऊन त्याला म्हणाले की, तू पोळ्याच्या दिवशी गावात तुझे बैल का आणले? या कारणावरुन शिवीगाळ केली. त्या वेळी अशोक संपती चौरे याने गचूरे धरून चाकु काढुन मांडीवर व गुप्तांगाजवळ धारदार चाकुने भोकसून गंभीर जखमी केले. अंकुश रामराव चौरे याने त्याच्या हातातील चाकु नामदेव चौरे याच्या कमरेला मारून जखमी केले आणि महिपती रघुनाथ चौरे याने लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच तुमच्याकडे बघून घेवू. असे म्हणून धमकी दिली. या प्रकरणी दि.24 ऑगस्ट रोजी केज पोलिसांना एमएलसी व वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्या वरून नामदेव पंढरी चौरे यांच्या फिर्यादी वरून अशोक संपती चौरे, बालासाहेब रघुनाथ चौरे, अंकुश रामराव चौरे, महिपती रघुनाथ चौरे या चौघा विरुद्ध केज पोलीस स्टेशनला गु.र.नं. 321/2020 भा.दं.वि. 326, 324, 323, 504, 506 व, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बाळकृष्ण मुंडे हे अधिक तपास करीत आहेत.

Tagged