गावात दहशत करण्यासाठी पिस्टलसह शस्त्रांचा वापर!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


पिस्टल, तलवार, कत्ती, चाकू सारखे शस्त्र जप्त; एलसीबीच्या तीन सख्या भावांना बेड्या
बीड
दि.12 : चारचाकीत किंवा हॉटेलमध्ये असताना सोबत पिस्टल, तलवार, कत्ती सारखे शस्त्र सोबत बाळगून गावात दहशत निर्माण करणार्‍या तीन सख्या भावंडांना राहत्या घरातून एलसीबीने बेड्या ठोकल्या. तर एकजण फरार झाला. त्यांच्याकडून पिस्टल, तलवार, कत्ती, चाकू असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई बर्दापूर ठाणे हद्दीतील पूस येथे बुधवारी (दि.12) सकाळी करण्यात आली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून एक कारही जप्त करण्यात आली आहे.

बंडू उर्फ बंटी विश्वनाथ उदार (वय 37), राजू उर्फ स्वप्निल विश्वनाथ उदार (वय 30), सचिन विश्वनाथ उदार (वय 32), संतोष विश्वनाथ उदार (वय 30) असे आरोपींचे नावे आहेत. हे सर्व अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील राहणार आहेत. गावाजवळच त्यांचे हॉटेल आहे. तिथे किंवा कारमध्ये फिरताना हे जवळ शस्त्र बाळगून दहशत निर्माण करायचे. स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी घरी छापा मारला. यावेळी एक पिस्टल, तलवार, कत्ती, चाकू अशी शस्त्रे व विदेशी दारु असा 2 लाख 85 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आर्मअ‍ॅक्टसह दारुबंदी कायद्यानुसार बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघे अटकेत असून संतोष उदार हा फरार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, तुळशीराम जगताप, पोह.रामदास तांदळे, मारोती कांबळे, विकास राठोड, बाळकृष्ण जायभाय, राजू पठाण, अर्जुन यादव, भागवत शेलार, बिभीषण चव्हाण, अतुल हराळे, महिला पोलीस अंमलदार स्वाती मुंडे, सुशीला हजारे यांनी केली.


पळून जाण्याचा प्रयत्न फसला
पोलीस घराची झडती घेत असताना बंटी उदार याने कपाटाची चावी आणतो म्हणून दुसर्‍या रुममध्ये कर्मचार्‍यासोबत गेला. यावेळी त्याने कर्मचारी एकटा असल्याची संधी पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. संतोष उदार हा फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

Tagged