नेकनूर पोलीसांनी पकडला 16 लाख रुपयांचा गुटखा!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

पिकअप जप्त करत दोघांना घेतले ताब्यात; गुटखा मालकावरही नेकनूर पोलीसात गुन्हा
नेकनूर
दि.12 : कर्नाटकातून बीड जिल्ह्यात पिकअपमध्ये गुटखा येत असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यावरुन नेकनूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी सापळा लावत हा पिकअप ताब्यात घेतला. त्यामध्ये 16 लाख 42 हजार 250 रुपयांचा गुटखा आढळून आला. पिकअप जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुटखा मालकासह तिघांवर नेकनूर पोलीस ठाण्यात (neknoor police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा अनंत काळे (वय 22 रा.शिदोड ता.बीड), ऋषीकेश राजकुमार गुंजाळ (वय 26 रा.चौसाळा ता.बीड) या पिकअप चालकासह गुटखा मालक विशाल बाजीराव नौशेकर (रा.चौसाळा, बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातून गुलबर्गा येथून सोलापूर-बीड रोडने गुटखा घेवून पिकअप (एमएच-23, यू-4912) येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. विलास हजारे (api vilas hajare) यांनी खाजगी वाहनातून कर्मचार्‍यांना पाठवत सापळा लावत हा पिकअप ताब्यात घेतला. त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला 16 लाख 42 हजार 250 रुपयांचा गुटखा आढळून आला. पिकअपसह 23 लाख 42 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे, पोह.प्रशांत क्षीरसागर, अनिल राऊत, बालासाहेब ढाकणे, यांनी केली.

Tagged