cyber crime

शेअर मार्केटमध्ये पैसे कमावून देतो म्हणत साडेचार लाखांची फसवणूक

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

सायबर पोलीसात गुन्हा दाखल
बीड
दि.20 : ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार सातत्याने घडत आहे. सायबर पोलीसांकडून वारंवार आवाहन करुनही अनेकजण या भामट्यांच्या जाळ्यात अडकतात. शेअर मार्केटमध्ये पैसे कमावून देतो, म्हणत एका भामट्याने बीडमधील नोकरदारास तब्बल चार लाख 55 हजार रुपयांना गंडा घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने सायबर पोलीसात धाव घेतली, या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड शहरातील बार्शी रोड परिसरात राहणार्‍या एका 35 वर्षीय नोकरदाराने सायबर पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याना रिसर्च भास्कर या कंपनीचे अमित पटेल याने तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे कमावून देतो असे म्हणून 4 लाख 55 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने सायबर पोलीसात धाव घेतली. या प्रकरणी कलम 420 अ, माहिती व तंत्रज्ञान कायदा 66 (क), 66 (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास सायबर विभागाचे निरीक्षक पुरषोत्तम चोबे करत आहेत.

Tagged