burning tempo

10 वी 12 वीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक

न्यूज ऑफ द डे

अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गावर 10 वी 12 वीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणार्‍या टेम्पोला अचानक आग लागली. संगमनेरमधील चंदनापुरी घाटात ही घटना घडली. टेम्पोच्या मागच्या बाजूने आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाने तातडीने दाखल होत टेम्पोला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत टेम्पो संपूर्ण जळून खाक झाला होता. या घटनेमध्ये जीवितहानी झाली नसली, तरी टेम्पो संपूर्ण जळून खाक झाला. या टेम्पोमधील दहावी बारावीच्या सर्व प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणे बोर्डाचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतरच पंचनामा करू अशी माहिती संगमनेर पोलिसांनी दिली.

दरम्यान दहावीच्या परीक्षा 15 मार्च आणि बारावीच्या परीक्षा 4 मार्च पासून सुरु होत आहेत. त्याआधीच ही दुर्घटना घडली आहे. असे असले तरी बोर्डाच्या परिक्षेवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Tagged