मराठा आरक्षणासाठी युवकाचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा

 पैठण  दि.22 : तालुक्यातील पाचोड येथील एका युवकाने मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालय दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी, आरक्षण संदर्भात लवकरच निर्णय घ्यावा या मागणीसाठी सिनेस्टाईल आंदोलन सुरु केले आहे. युवकाने पाचोड परिसरातील बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले असून आंदोलनाची पूर्वकल्पना असताना देखील पाचोड पोलीस ठाण्याची गोपनीय शाखा मात्र झोपेत असल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील पाचोड येथील छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भागवत बाबुराव भुमरे यांनी स्थानिक प्रशासनाला अनेक दिवसापूर्वी मराठा आरक्षणास दिलेली सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती तात्काळ उठवावे व आरक्षण संबंधित लवकरच निर्णय घ्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दिले होते. पाचोड गोपनीय शाखेचे पोलीसांनी झोपेचं सोंग घेतल्याने या युवकाची समजूत काढण्यास अपयश आल्यामुळे सदरील युवकांनी आपल्या मागणीसाठी चक्क पाचोड येथील बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या आंदोलन करत्याला समजावून खाली उतरणे बाबत प्रयत्न सुरू केला आहे.

Tagged