कृषि मंत्र्यांचे बीड जिल्हा प्रशासनाला ‘हे’ महत्वाचे आदेश

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

बीड, गेवराई तालुक्यात पाहणी

बीड : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिले.

बीड जिल्ह्यातील गेवराई व बीड तालुक्यात प्रत्यक्ष भेट देऊन अतिवृष्टीग्रस्त पिकांची पाहणीप्रसंगी ते बोलत होते. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात सोयाबीन, तूर, बाजरी, कापूस आदि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सत्तार यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माजी राज्यमंत्री प्रा. सुरेश नवले, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले, तालुकाप्रमुख शिनु बेदरे, कृष्णा वांगीकर, तहसीलदार सचिन खाडे, तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते, संबंधित मंडल अधिकारी, तलाठी उपस्थित होते. कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी गेवराई तालुक्यातील गेवराई व पाडळसिंगी तसेच बीड तालुक्यातील पारगाव जप्ती या तीन ठिकाणी अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष बांधावर संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश दिले. नुकसानग्रस्त कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Tagged