accident

महामार्ग पोलिसांच्या दुचाकीला पिकपची धडक; दोघे गंभीर जखमी

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड : रात्री ड्युटी करून सकाळी घरी जात असलेल्या महामार्ग पोलिसांच्या दुचाकीला भरधाव पिकअपने जोराची धडक दिली. हा अपघात मंगळवारी (दि.22) सकाळी बीड बायपासवरील महालक्ष्मी चौकात घडली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
महामार्ग पोलीस कर्मचारी तांदळे व राख हे पडलसिंगी टोलनाक्यावरून रात्री ड्युटी करून सकाळी दुचाकीवरून (एमएच 23, एझेड 6658) बीडकडे येत होते. बीड बायपासवरील महालक्ष्मी चौकात आल्यानंतर समोरून भरधाव आलेल्या बोलेरो पिकअपने (जिजे- 27 एक्स-6946) जोराची धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

Tagged