bachhu kadu

आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न पण जरांगे पाटलांनी निर्णय मागे घ्यावा

बीड


बच्चू कडू यांचे आवाहन
बीड

दि.25 ः प्रामाणिकपणे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले आहे. सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. मात्र एवढ्या महिन्यांची मेहनत, एवढा मोठा विश्वास त्यांच्या पाठीशी आहे. मात्र हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी काही शक्ती काम करत आहेत. जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आंदोलन मोडित निघेल. एवढ्या घेतलेल्या मेहनत असफल होईल. त्यामुळे त्यांनी हा निर्णय मागे घेवून बैठक घेवून निर्णय घ्यावा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेत बोलतांना पुढे बच्चू कडू म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचा जीव खुप महत्वाचा आहे, जीव घेण्यासाठी हे आंदोलन उभे केलेले नाही. यातून चांगला मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करु. हा टोकाचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा असे आवाहनही बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच बारस्कर यांनी व्यक्तीगत आरोप करुन आंदोलन चिगळण्याचा प्रयत्न करु नये. जाणिवपूर्वक डिवचण्याचे काम करु नये हे थांबवावे. असेही बच्चू कडू म्हणाले. मनोज जरांगे पाटील हे एका गावापुरते मर्यादीत नसून करोडो लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. त्यांनी असा निर्णय घेऊ नये, असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले आहे.

Tagged