MANOJ JARANGE

गाडी थेट फडणवीसांच्या दारात घ्या, मला मारु द्या…

बीड

बीड दि.25 :  मराठा समाजाला संपविण्याचे काम सुरु आहे. मला गुंतविण्याचे किंवा मारण्याचे षडयंत्र रचले जात आहे. पोलीसांच्या किंवा डॉक्टरांच्या हाताने याला मारा असा प्लॅन देवेंद्र फडणवीसांनी रचला जात आहे. पण मला मारणे सोपे नाही. मुंबईत आल्यावर पोलीसांच्या हाताने गोळ्या घाल, मराठा काय असतो ते दाखवतो. गाडी थेट फडणवीसांच्या दारात घ्या, त्यांचे पोलीस मला गोळ्या घालतील घालू द्या, मला मारु द्या असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

संभाजीनगरला पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना येऊ दिले नाही. उपोषण सोडवण्यासाठी अंतरवालीत येऊ दिले नाही याचा हा राग फडणवीसांच्या मनात आहे. ते मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाहीत, त्यांचाच पुर्ण डाव असल्याचाही आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच  मुंबईला सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. हवे तर माझा बळी घ्या पण सगेसोयर्‍यांची अंमलबजावणी करा अशी मागणी करणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या निर्णयामुळे अंतरवालीत गोंधळ निर्माण झाला असून मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे.

जरांगे पाटील तुम्हीच
समाजासाठी सर्वकाही..

मनोज जरांगे पाटील तुम्ही आमच्यासाठी सर्वकाही आहात.. आरक्षण आज ना उद्या मिळेल पण तुम्ही प्रकृतीला सांभाळा अशी आर्तहाक मराठा समाजबांधव यांच्याकडून जरांगे पाटील यांना दिली जात आहे.

माहिती घेऊन प्रतिक्रिया
देतो- देवेंद्र फडणीवस

मी काहीही ऐकलेले नाही. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर, मनोज जरांगे पाटील हे काय बोलले हे पाहिल्यानंतरच तुमच्याशी बोलेल अशी प्रतिक्रिया सातारा येथे जलपुजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देतांना माध्यमांशी बोलणे टाळले. 

Tagged