MANOJ JARANGE PATIL

देवेंद्र फडणवीस घाबरले; मनोजजरांगे पाटील अंतरवालीत परतले!

बीड

बीड दि.25 ः काल आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते. मात्र भांबेरी येथे मुक्काम केल्यानंतर सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस हरला म्हणत, त्याने सागर बंगल्याचे दार उघडे असल्याचे सांगितले मात्र ते बंद केले. पोलीस बंदोबस्त वाढवला, मला मराठा समाजाचे नुकसान करायचे नाही, असे म्हणत सर्वांनी आहे तसे माघारी फिरावे, आपल्या गावाकडे जावे असे आवाहन केले. व स्वतः अंतरवालीत पोहचले. तसेच अंबड येथे संचारबंदी लागू केल्याने तिथे गेल्यावरही सर्व समाजबांधवांना शांततेत आपल्या घरी परत जाण्यास सांगितले. आपल्याला शांततेत यश मिळवायचे आहे असेही जरांगे यांनी म्हटले.

रविवारी (दि.26) दुपारी अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, मराठा समाजाला संपविण्याचे काम सुरु आहे. मला गुंतविण्याचे किंवा मारण्याचे षडयंत्र रचले जात आहे. पोलीसांच्या किंवा डॉक्टरांच्या हाताने याला मारा असा प्लॅन देवेंद्र फडणवीसांनी रचला जात आहे. पण मला मारणे सोपे नाही. मुंबईत आल्यावर पोलीसांच्या हाताने गोळ्या घाल, मराठा काय असतो ते दाखवतो. गाडी थेट फडणवीसांच्या दारात घ्या, त्यांचे पोलीस मला गोळ्या घालतील घालू द्या, मला मारु द्या असे जरांगे पाटील यांनी म्हटले, त्यांनतर पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत ते मुंबईकडे रवाना झाले. याची माहिती राज्यभरात वाऱ्यासारखी पोहचल्यानंतर लाखोच्या संख्येने मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या ताफ्यात सहभागी झाले. भांबेरी येथे रात्री मुक्काम करण्यात आला. दरम्यान जरांगे पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत पुढे अडविण्यासाठी पुढे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. फडणवीस घाबरले म्हणत त्यांनी आता शहाणे व्हावे. एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी मिळून सगेसोयरे याची अंमलबजावणी करावी अशी विनंती करतो म्हणत जरांगे पाटील यांनी सगळ्या समाजबांधवांना परत जाण्याचे आवाहन केले. व अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू राहील असे सांगितले.

Tagged