पम्चर ऊसाच्या ट्रॅक्टरला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.21 : उस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पम्चर झाल्यामुळे धुळे-सोलापूर महामार्गावर उभे होते. सोमवारी (दि.21) रात्रीच्यावेळी एका भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यावेळी दुचाकीस्वाराची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रांजणी परिसरात ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर पम्चर झाल्यामुळे रस्त्यावरच उभे होते. रात्रीच्यावेळी एका भरधाव ट्रकने त्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॅक्टरच्या ट्रॉली पलटी होऊन ऊस रस्त्यावर पडला. याच दरम्यान एका दुचाकीची (एमएच-23 एके 1106) टॅ्रक्टरच्या ट्रॉलीला धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी महामार्ग पोलीस सपोनि.प्रविणकुमार बांगर, तांदळे, पोना.साळुंके, सागर शेळके, भोकरे, जाधव, बांगर, राख यांनी धाव घेत रस्त्यावर वाहने बाजुला करत वाहतूक कोंडी सुरुळीत केली. मयताची ओळख पटलेली नसून पोलीस अधीक तपास करत आहेत.

Tagged