बीड दि. 26 : डॉ.भारतभूषण क्षीरसागर व योगेश क्षीरसागर यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ सारिकाताई क्षीरसागर यांच्या उपस्थित क्षीरसागर समर्थकांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी निवेदन दिले. तसेच खोटे गुन्हे मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, डॉ.भारतभूषण क्षीररसागर व योगेश क्षीरसागर यांच्यावर येथील कार्यालयात खरेदी-विक्री झालेल्या घटनेत सतीश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे पूर्णता खोटे असून या प्रकरणात डॉ.भारतभूषण क्षीरसागर, योगेश क्षीररसागर यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध नाही. हा संपूर्ण प्रकार अन्यायकारक असून वरील गुन्हे राजकीय हेतूने दबाव टाकून दाखल करण्यात आलेले आहेत. भारतभूषण क्षीरसागर व योगेश क्षीरसागर यांचा राजकीय प्रवास पाहता त्यांना बदनाम करण्याच्या हेतूने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरी पोलीस प्रशासनाने न्यायिक भूमिका घेऊन वरील गुन्हे तातडीने रद्द करावेत, अन्यथा लोकशाहीमार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने क्षीरसागर समर्थक उपस्थित होते.