विषबाधेमुळे तीन बालकांचा मृत्यू

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

बागझरी येथील घटना; आई अत्यवस्थ

अंबाजोगाई : तालुक्यातील बागझरी येथील काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या कुटुंबातील ३ बालकांसह पत्नी अशा चार सदस्यांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (दि.२६) सकाळी उघडकीस आली. यात तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

साधना (वय ६), श्रावणी (वय ४), नारायण (८ महिने) अशी मृत बालकांची नावे आहेत. तर, पत्नी भाग्यश्री (वय २८) यांची देखील प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी (दि.२५) रात्रीच्या जेवणानंतर ही विषबाधा झाली असल्याचा संशय काशीनाथ धारासुरे यांनी व्यक्त केला. परंतु, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

आ.संजय दौंड यांची रुग्णालयात भेट
घटनेची माहिती मिळताच आ.संजय दौंड यांनी स्वाराती रुग्णालयात भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.राकेश जाधव व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Tagged