बीड दि.26 : येथील रजिस्ट्री कार्यालयात रजिस्ट्रीसाठी आलेल्याना धारदार शस्त्राचा धाक दाखवून कुकरीने हल्ला केला. तसेच पैशाची बॅग लंपास केली. याप्रकरणी रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर आदींसह आठ जनांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्यासह दरोड्याचा शनिवारी (दि.26) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राजिस्ट्री कार्यालयात राजिस्ट्रीसाठी आल्यानंतर आरोपींनी चाकूचा धाक दाखवून हल्ला केला. जवळ असलेली लाखो रुपयांची बॅग घेऊन जाऊन फिर्यादीस जिवे मारण्याचा उद्देशाने हल्ला केला. या प्रकरणी रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर, सिद्दीकी फारुकी, अशोक रोमण, गणेश भरनाळे, यांच्यासह आठ जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कलम 307, 395, 147, 148, 149 सह भारतीय हत्त्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा प्राथमिक तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे हे करत आहेत.