बीड दि.27 : महंत शिवाजी महाराज यांच्या नेतृतवाखाली हा नारायण गड काम करत असल्याचा आनंद आहे. एवढे दिवस मी गडावर आलो नाही. याची खंत वाटते. कोल्हापूर कुठे, पश्चिम महाराष्ट्र कुठे पण भक्ती आणि शक्तिचा संगम झाल्यानंतर एक विचार तयार होतो. हे मागील 350 वर्षापासून सुरू आहे. वारीला संरक्षण देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले ती परंपरा पुढे सुरू आहे. मी पण आनंदाने वारीमध्ये सहभागी होत असतो. असे छत्रपती संभाजी महाराज म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराज हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. सोमवारी (दि.27) सकाळी त्यांनी श्री क्षेत्र नारायणगडावर जाऊन नगद नारायणाचे दर्शन घेतले. यावेळी गडाच्यावतीने विश्वासस्तांनी संभाजी महाराज व महंत शिवाजी महाराज यांचा सामूहिक सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. पुढे बोलताना छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की, गडाच्या विकासासाठी मी मदत करेल. खासदार नसलो तरी वेगवेगळ्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करेल. असे जुनी प्राचीन मंदिर पश्चिम महाराष्ट्र येथे नाहीत. नारायण गडाच्या वैभवात भर घालण्यासाठी काम करूया असेही छत्रपती संभाजी महाराज म्हणाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी श्री क्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, गडाचे विश्वस्त अनिल जगताप, बळीराम गवते, सीए. बी.बी.जाधव, दिलीप गोरे, ॲड.महादेव तुपे, गोवर्धन काशीद, कारागृह अधीक्षक विलास भोईटे, कारागृह निरीक्षक महादेव पवार, धनंजय जाधव, अप्पासाहेब कुडेकर, सचिन मोटे, ऋषिकेश बेदरे, राहुल दुबाले, रवी शिंदे, विजय लाटे, अशोक सुखवसे, नाना पवार, अशोक जोगदंड, गोविंद गवते आदींसह छत्रपती संभाजी महाराज यांच्या समर्थकांची उपस्थिती होती.