बीड जिल्हा : पोलीस अधीक्षकांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड


बीड, दि. 20 : बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरानाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

हा पोलीस गार्ड पोलीस अधीक्षकांच्या शासकीय बंगल्यावर होता. दोन दिवसांपुर्वी त्यांने स्वॅब दिला होता. त्याच्या स्वॅबचा रिपोर्ट नुकताच जिल्हा आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाच्या संपर्कातील एकूण 14 जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली. यात पोद्दार यांचा देखील समावेश आहे.

Tagged