पतंजलीने केले करोनावरील आयुर्वेदिक औषध लाँच

देश विदेश न्यूज ऑफ द डे

हरिद्वार: जगभरात करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी करोनावरील लस शोधण्याचे काम सुरू आहे. भारतात योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं करोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ लाँच केलं आहे. योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत हे औषध जगासमोर आणण्यात आलं. हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच करण्यात आलं.

संपूर्ण देश आणि जग ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होता तो क्षण आता आला आहे. करोनावरील पहिलं आयुर्वेदिक औषध तयार करण्यात आलं आहे. या औषधाच्या मदतीने आम्ही करोनाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीवर नियंत्रण मिळवू शकू, असं बाबा रामदेव यावेळी म्हणालें. या औषधाच्या साहाय्यानं तीन दिवसांच्या आत 69 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर 7 दिवसांमध्ये 100 टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. या औषधाची चाचणी 280 जणांवर करण्यात आली, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Tagged