कोरोनावर हे औषध… गोळीची किंमत 103 रूपये

देश विदेश न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

भारतातील ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने औषध आणले आहे. हे औषध लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने ग्लेनमार्कच्या औषधाला परवानगीही दिली आहे.

दिल्ली ः कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने औषध आणले आहे. या अँटीव्हायरल औषधाचे नाव फेविपिरावीर असे आहे. कंपनीने ही माहिती दिली. ’डीजीसीआई’ने या औषधाच्या उत्पादनाला आणि विक्रीला केंद्राने परवानगी दिली आहे, अशी माहिती कंपनीने दिली.

अमेरिकेतील काही कंपन्यांकडून वेगाने संशोधन सुरू आहे. पण ग्लेनमार्क फार्मान कोरोनाचे सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी औषध आणले आहे. याची एका गोळीची किंमत ही 103 रुपये इतकी आहे. कोरोना व्हायरसची सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णावर फेविपिरावीर औषध परिणामकारक ठरेल, असा दावा ग्लेनमार्क फार्माने केला आहे.विशेष म्हणजे कोरोना रोखण्यासाठी पहिल्यांदाच एखाद्या औषधाला सरकारने मान्यता दिली आहे.

Tagged