crime

गेवराई तालुक्यातील डोंगरावर आढळला मानवी सांगाडा!

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

घातपात की आत्महत्या; घटनेने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली

गेवराई दि.26: शहरापासून जवळ असलेल्या पालख्या डोगरावर एक मानवी शरीराचा सांगाडा सापडला असुन त्याचे मुंडके झाडाला टागलेले तर धडाचा सापळा खाली पडलेल्या आवस्थेत आढळल्याने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगरावर एक बेवारस दुचाकी पडलेली आहे, अशी माहिती दि. 24 रोजी रात्री पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळावर जावुन पाहणी केली. तेंव्हा एका झाडाला मानवी सांगाडा लटकलेलेल्या आवस्थेत दिसला. यामधे त्याचे मुंडके झाडाला टांगलेले होते शरीराचा पुर्ण सांगाडा झालेल्या आवस्थेत होता पोलीसांनी घटनेचा पंचनामा करुन सांगाडा तपासणीसाठी आंबाजोगाई येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरीकामधे घबराट पसरली आहे. दिड महिन्यापूर्वी एक मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीसांना प्राप्त झाली होती. त्या अनषंगाने पोलीस तपास आहेत. सांगाड्याचा आहवाल आल्यावर सत्य समोर येइल. तेव्हा हा घातपात आहे की आत्महत्या हे स्पष्ट होईल.

Tagged