माझ्यासह अनेक भारतीय सुखरूप!

न्यूज ऑफ द डे परळी

परळीच्या भार्गवी भातलवंडेचा थेट राशियातून संदेश

परळी : सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू असल्याने कधी काय होईल याचा नेम नाही. मात्र आम्ही रशियात जिथे राहतो त्या भागात सुदैवाने युद्धाची ठिणगी पडलेली नाही. माझ्यासह अनेक भारतीय येथे सुखरुप असून आम्ही आमचे शिक्षण पूर्ण करुनच येणार असल्याचा विश्वास मुळच्या परळीची रहिवाशी असलेल्या भार्गवी गिरीष भातलवंडे हिने व्यक्त केला आहे. भार्गवी सध्या रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असून गणेशपार परिसरातील श्री बालाजी मंदिर, गणेश पार येथे ती राहते. एमबीबीएसच्या शिक्षणासाठी थेट रशियात पोहचली आहे.

रशिया येथील सिंफेरोपोल येथे क्रिमीयन फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या दुसर्‍या वर्षात शिकत आहे. सध्या रशिया युक्रेनवर जोरदार हल्ला करीत असून रशियामध्ये काय स्थिती आहे असे तिला आमच्या प्रतिनिधीने विचारले असता आम्ही सुरक्षीत आहोत असे तिने सांगीतले. रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला असून या युद्धाचे प्रत्युत्तर सिमेपर्यंतच मर्यादीत असल्याने आम्ही जिथे वास्तव्यास तिथे कोणताही धोका नसल्याचे भार्गवीने सांगीतले. अत्यंत धोकादायक व तितकीच विचीत्र परिस्थिती असली तरी आमची सुरक्षा सरकारकडून केली जात असल्याने आम्हाला काही धोका नाही असे तिने सांगितले.

रशिया प्रशासनाकडून सल्ला
युद्धजन्य परिस्थितीतही अभ्यासावरचे लक्ष विचलीत होता कामा नये, असा आम्हाला प्रशासनाकडून सल्ला दिला गेल्याचे तिने सांगितले आहे. तसेच आई आणि वडिलांचा आशीर्वाद सोबत असल्याने आपण वैद्यकीय शिक्षण पुर्ण करुनच भारतात म्हणजेच पोहचूत असे भार्गवीने सांगितले. माझ्यासोबत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी असून आम्ही सुरक्षीत असल्याचेही माहिती तिने दिली आहे.

Tagged