acb trap

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

क्राईम गेवराई बीडगेवराई : जमिनीचा सातबारा व 8-अ उतारा देण्यासाठी लाचेची मागणी करणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. गेवराई शहरातील ताकडगाव रोडवरील रुची भोजनालायत सोमवारी (दि.8) रात्री ही कारवाई करण्यात आली.
दादासाहेब सुखदेव आंधळे (वय 34) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. त्यांनी तक्रारदारास जमिनीचा सातबारा व 8-अ उतारा देण्यासाठी लाचेची मागणी केली. 220 रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी कैलास नारायणराव ढोले यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.9) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Tagged