प्राचार्या भारती बांगर यांचे निधन

गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

गेवराई दि.7 : शहरातील इंदिरा गांधी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या भारती बांगर यांचे मंगळवारी (दि.7) पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे तालुक्यात सर्वत्र सुपरिचित होत्या त्यामुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
भारती बांगर (वय 70) यांचे बीड जिल्ह्यामध्ये मोठे नाव लौकिक होते. त्यांनी इंग्रजी माध्यमाची गेवराई तालुक्यात पहिली शाळा सुरू करून तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आपली एक ओळख निर्माण केली होती त्यांना शिक्षण क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्यावर इंदिरा गांधी इंग्लिश स्कूल या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्या अतिशय शांत आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या त्यामुळे त्यांच्या निधनाने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्या डॉक्टर डी.व्ही.बांगर यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बांगर परिवार यांच्या दुःखात दैनिक कर्यारंभ परिवार सहभागी आहे.

Tagged