आजही कोरोनाचा आकडा दीडशेच्याजवळ

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा गेल्या पाच दिवसापासून दरदिवशी दीडशेच्या जवळ असतो. आजही 146 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

जिल्हा प्रशासनाला 1 हजार 152 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 हजार 6 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये अंबाजोगाई तालुक्यात 32, आष्टी 11, बीड 30, धारूर 10, गेवराई 13, केज 14, माजलगाव 11, परळी 9, पाटोदा 6, शिरुर 6, वडवणी 4 असे एकूण 146 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Tagged