18 जणांना सुखरूप बाहेर काढले
अंबाजोगाई दि.28 : तालुक्यात आपेगाव येथे मांजरा धरणाचे पाणी शिरल्याने अर्धे गाव पाण्यात सापडले होते, या गावात आज एनडीआरएफची तुकडी दाखल झाली. आतापर्यंत सकल भागात अडकून पडलेल्या तब्बल 18 जणांना सहीसलामत बाहेर काढल्याने गावकरी वर्गाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.
एनडीआरएफचे पथक आपेगावमध्ये दाखल झाल्याने बचाव कार्याला वेग आला आहे. एनडीआरएफच्या जवानासोबत आपेगाव येथील शाळेचे मुख्याध्यापक कचरू रंजवे, सहशिक्षक निलेश शिंदे आदी शोधकार्यात मदतीला धावून आले.