बीड जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागाला शिक्षणाधिकारी मिळाले

न्यूज ऑफ द डे बीड

शालेय शिक्षण विभागाचा आदेश

बीड : जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. ही रिक्त पदे भरण्याची मागणी सातत्याने होते. अखेर माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी नागनाथ म. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून बीड जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी पद रिक्त होते. या पदाचा अतिरिक्त पदभार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता विक्रम सारूक यांच्याकडे होता. या रिक्त जागी अखेर नागनाथ म. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने बुधवारी नियुक्तीबाबत आदेश काढले.

Tagged