पाथरीचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू

बीड

परभणी: पाथरी येथील माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा शुक्रवारी सायंकाळी अपघाती मृत्यू झाला. तो चालवत असलेली दुचाकी गंगाखेड रस्त्यावरील उड्डाण पुलावर अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आली. या दुर्दैवी घटनेने परभणी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

नेमका हा अपघात कसा झाला याची कुणालाही कल्पना नाही. माजी आमदार मोहन फड यांचा लहान मुलगा पृथ्वीराज फड हा मुंबईत शिकतो. लॉकडाऊन मुळे मागच्या काही दिवसांपासून तो परभणीत होता.आज संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास पृथ्वीराज हा त्याची स्क्रॅमलर डुक्याटी या मोटारसायकल वरून गंगाखेड रस्त्याकडे जात असताना उड्डाणपुलावर त्याचा अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली व फड कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात पोचले.

नेमका अपघात झाला कसा?

संध्याकाळी पृथ्वीराज हा गंगाखेड रस्त्याकडे जात असताना हा अपघात झाला ज्यात अत्यंत महागडी असलेली त्याच्या बुगाटी कंपनीची दुचाकी समोरून पूर्णपणे चकनाचुर झाल्याने हा एवढा गंभीर अपघात नेमका कुठल्या वाहना बरोबर झाला हे मात्र कुणालाही कळु शकले नाही कारण घटनास्थळी केवळ दुचाकींच पडलेली होती त्यामुळे त्या वाहनाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे..

Tagged