collector jagtap

15 मे पासून पुन्हा दहा दिवसांसाठी कडक निर्बंध

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाधिकार्‍यांचे नवीन आदेश
बीड दि.13 : पाच दिवसाच्या कडक लॉकडाऊननंतर पुन्हा पुढे दहा दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. 15 मे रोजी रात्री 12 वा.पासून म्हणजेच 16 मे पासून 25 मे रोजी रात्री 12 वा.पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत.
गुरुवारी (दि.13) जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या नवीन आदेशानुसार, 1. दिनांक 15 मे 2021 रोजीचे रात्रीचे 12 वाजेपासून ते 25 मे 2021 रोजीचे रात्रीचे 12 चे या दरम्यान केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील. सर्व औषधालये, दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्रे, वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इ. उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत.

2. दूध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत सुरू राहील.

3. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील.

4. बैंक ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत केवळ शासकीय व्यवहार, पेट्रोलपंप व गॅस एजन्सी धारकांचे व्यवहार, कृषी निविष्ठांशी संबंधित व्यवहार, वैद्यकिय कारणास्तव केले जाणारे व्यवहार, सर्व शासकीय योजनेचे लाभार्थी यांचे वेतनाबाबतचे व्यवहार, अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणा-या आस्थापना यांना या वेळेत बँकेत जाऊन व्यवहार करण्यास मुभा असेल. दरम्यानच्या काळात एटीएम कॅशच्या वाहनांना परवानगी असेल. तसेच दुपारी 1 ते 4.45 वाजेपर्यंत बँकेचे कर्मचारी यांना केवळ अंतर्गत कामकाजास मुभा असेल.

5. शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे सुरु राहतील, (ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल.) 6. लसीकरणा करीता 45 वर्षावरील ज्या व्यक्तींचा दुसरा डोस साठी मेसेज आला आहे, / आरोग्य विभागाचे पत्र आले आहे. त्यांनाच लसीकरणचा डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल (लसीकरणासाठी आलेला मेसेज / आरोग्य विभागाचे पत्र, आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असेल)

7. कृषी व्यवसायाशी संबंधित बि-बियाणे, खते, औषधे यांची जी दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेले बि-बियाणे, खते, औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरुण घेण्यास मुभा असेल.

8. नरेगाची कामे सुरु राहतील. त्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा व कोविड 19 विषयक जे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक असेल. 9. ल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिनांक 16 मे 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत केवळ गोडाऊन ते स्वस्त धान्य दुकान किंवा गोडाऊन या ठिकाणी माल उतरुण घेणे व दिनांक 21 मे 2021 पासून सकाळी 7 ते 11 या वेळेतच लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील. (राशनसाठी जाणा-या व्यक्तींच्या सोबत राशनकार्ड, आधार कार्ड असणे आवश्यक आहे.)

10. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पूर्णवेळ पूर्णपणे बंद राहतील. दिनांक 15 मे 2021 रोजीचे रात्रीचे 12 वाजेपासून ते 25 मे 2021 रोजीचे रात्रीचे 12 वाजेपर्यंत या कालावधीत निर्बंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात येऊन त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.

Tagged