रमजान ईदनिमित्त बीड शहरात दुधाचे टँकर दाखल

न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.13 : रमजान ईदच्या अनुषंगाने शहरातील मुख्य चौकामध्ये प्रशासनाच्यावतीने दुधाच्या टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली होती. गुरुवारी (दि.13) सायंकाळी 5 च्या सुमारास सामाजिक बांधिलकेतून माऊली एजन्सीच्यावतीने शहरातील कारंजा, तकीया मस्जिद शहेंशहा नगर, मोमीनपुरा परिसरामध्ये अल्पदरामध्ये दुध विक्री सुरु करण्यात आली आहे.
कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. रमजान ईदच्या अनुषंगाने दुध अत्यावश्यक आहे. परंतु बंद असल्यामुळे नागरिकांना बाहेर फिरता येत नाही. त्यामुळे टँकरने दुधाची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शहरातील माऊली एजन्सीच्यावतीने शहरातील काही भागामध्ये दुधाचे टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. चाळीस रुपये लिटरने दुधाची विक्री केली जात आहे. नागरिकांनी टँकरजवळ गर्दी करु नये असे अवाहनही करण्यात आले आहे. सोशलडिस्टन्सिंगसह कोरोना नियमाचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे अवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Tagged