MURDER

४ वर्षीय भाच्याचा खून!

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड

नागापूर येथील खळबळजनक घटना

परळी : बहिणीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार वर्षीय भाच्याचा मामाने खून केल्याची परळी तालुक्यातील नागापूर येथील घटना रविवारी समोर आली.

कार्तिक विकास करंजकर (वय ४, मु. पो.लाडेगाव ता.केज) असे मृत बालकाचे नाव आहे. तो आई सुरेखा विकास करंजकर सोबत आजोळी गेला होता. त्याच्या आईचे व मामाचे भांडण झाले. याच भांडणाचा राग मनात धरून शहानिक लक्ष्मण चिमणकर (वर्षे २७ रा.नागापूर) याने कार्तिकच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्याला उपचारार्थ सरकारी दवाखान्यात पाठविले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी देखील भेट दिली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पीएसआय पोवळे हे तपास करत आहेत.

Tagged