बीड, दि. 27 : परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतल्यानंतर काही कामगारांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आज बीड बसस्थानकातून पोलीस बंदोबस्तात बससेवा सुरु झाली आहे. बीड ते गेवराई ही पहीली बस आज सुरु झाली. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे अवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत संपावर गेल्याने महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. सरकारशी अनेक चर्चा होऊनही हा संप मागे घेतला जात नव्हता. शेवटी सरकारने पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला मात्र तरीही कर्मचारी कामावर परतत नव्हते. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीचा पुनर्विचार करण्यात येईल असा इशारा दिला. त्यानंतर आजपासून कर्मचारी कामावर परतण्यात सुरुवात झाली. बीडमध्ये सकाळी 10ः30 च्या सुमारास बीड ते गेवराई अशी पहिली बस 6 प्रवाशांना घेऊन धावली आहे. दुसरी बस बीड-केज अशी धावली. आता सर्व बस टप्प्याटप्प्याने सुरु होतील अशी माहिती महामंडळाच्यावतीने देण्यात आली.