ncp

घड्याळ अजित पवारांचे; निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब

बीड


मुंबई, दि.6 : महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. शरद पवार SHARAD PAWAR आणि अजित पवार AJIT PAWAR यांच्या भांडणात राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोगाने ELECTION COMMISSION घेतला असून त्यात पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालंय.
निवडणूक आयोगाच्या या निकालाने येणार्‍या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र शरद पवार गटाचा कस लागणार असून त्यांना अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचा व्हिप पाळावा लागेल असं चित्र दिसतंय. राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगासमोर होता. त्यावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाचं असल्याचं सांगत तेच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं.
शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या त्याच पद्धतीने घडामोडी या नंतरच्या राष्ट्रवादीमध्ये घडल्या. अजित पवारांनी भाजपला साथ दिल्यानंतर बहुतांश आमदार हे त्यांच्यासोबत गेले आणि राष्ट्रवादीचा वाद हा निवडणूक आयोगामध्ये पोहोचला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार गटाला आता उगवता सुर्य हे चिन्ह आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे नाव मिळू शकते अशी माहिती मिळत आहे.