BEED SP OFFICE

गेवराई पेंडीग; 10 ठाण्याला मिळाले नवीन ठाणेदार!

बीड

दि.24 : बीड पोलीस दलातील 10 पोलीस ठाण्यात नवीन ठाणेदार म्हणून नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि.24) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले. मात्र गेवराई व केजचे ठाणेदार अद्याप नियुक्त केले नसून येथे प्रवीणकुमार बांगर, संजय लोहकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

दिलेल्या नियुक्तीमध्ये माजलगाव ग्रामीणचे पोनि.शिवाजी बंटेवाड बीड ग्रामीण, मानव संसाधनचे पोनि.बालक पांडुरंग कोळी माजलगाव ग्रामीण, माजलगाव शहरचे शितलकुमार रामनाथ बल्लाळ बीड शहर, शिवाजीनगरचे पोनि.केतन काशिनाथ राठोड माजलगाव शहर, जिल्हा वाहतूक शाखेचे पोनि.अशोक काशिनाथ मुदिराज पेठ बीड, परळी शहर ठाण्यातील सपोनि.गोरकनाथ बाबासाहेब दहिफळे सिरसाळा, पाटोद्याचे सपोनि.भार्गव सुदाम सपकाळ अंमळनेर, वाहतूक शाखेतील सपोनि मधुसूदन रामकृष्ण घुगे पिंपळनेर, अंमळनेरचे सपोनि चंद्रकांत गोविंद गोसावी नेकनूर तर आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि.सुभाष बाबासाहेब सानप यांना जिल्हा वाहतूक शाखेत नियुक्ती देण्यात आली. या बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी काढले.

Tagged