crime

महिला तलाठ्यासोबत हुज्जत, एकावर गुन्हा दाखल

अंबाजोगाई क्राईम बीड

अंबाजोगाई : मला कार्यालयात का येऊ देत नाही म्हणत महिला तलाठ्याशी हुज्जत घालून त्यांच्या हातातील सातबाराचे रजिस्टर फाडून टाकले. तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. ही घटना अंबाजोगाई शहरात मंगळवारी (दि.23) दुपारी घडली. या प्रकरणी महिला तलाठी यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माया प्रभू चव्हाण या साकुड सज्जाच्या तलाठी आहेत. मंगळवारी अंबाजोगाईचा आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातून अनेक लोक येतात. त्यामुळे शेतकर्‍यांना पिक कर्जासाठी लागणारे कागदपत्रे, फेरफार नकला, सात बारा, 8-अ हे देण्यासाठी त्या अंबाजोगाईतील प्रशांत नगर कार्यालयात थांबल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयाचा दरवाजा पुढे करून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पळून त्यांचे कामकाज सुरु होते. दुपारी 2 वाजताच्या सुमारास मांडवा पठाण येथील बाबासाहेब बळीराम जोगदंड हा शेतकरी त्यांच्या कार्यालयात आला. मला तुम्ही कार्यालयात का येऊ देत नाहीत असे म्हणत त्याने जबरदस्तीने आत प्रवेश केला. मांडवा पठाण गावचा गट दाखवा म्हणत चव्हाण यांच्या हातातील गट रजिस्टर हिसकावून घेत त्याचे दोन तुकडे केले. चव्हाण यांच्याशी अर्वाच्च भाषा वापरत अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी माया चव्हाण यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब बळीराम जोगदंडवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक दहिफळे करत आहेत.

Tagged