raj-thakre

राज ठाकरेंच्या घरात कोरोनाचा शिरकाव

न्यूज ऑफ द डे राजकारण

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे mnd अध्यक्ष राज ठाकरे raj thakare यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी काम करणार्‍या दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. या दोन्ही व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन सुरक्षा रक्षकांना व दोन चालकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी चालकांवर मुंबईतील mumbai रुग्णालयात उपचार सुरू असून सुरक्षा रक्षक security gaurd कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळं धोका टळला असं वाटत असतानाच आता राज यांच्या घरी काम करणार्‍या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळं मनसैनिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

Tagged