corona

बीड जिल्हा : आज 13 स्वॅब पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातून मंगळवारी पाठविण्यात आलेल्या 288 स्वॅबपैकी 13 स्वॅब अवाहल पॉझिटिव्ह आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार CEO AJIT KUMBHAR यांनी ही माहिती दिली. एकाच दिवशी एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
     बीड शहरातील पांडे गल्ली येथील 60 वर्षीय स्त्री पॉझिटिव्ह आढळून आली. त्यांना औरंगाबाद येथून आल्याचा प्रवासाचा इतिहास आहे. तर औटी गल्ली येथील 78 वर्षीय तर बीड मामला येथील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यांना प्रवासाचा ईतिहास नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
     परळी शहरात 29, 20, 25 वर्षीय पुरुष, 50, 52 वर्षीय स्त्री आढळून आली. हे सर्व एसबीआय शाखेतील बाधित कर्मचार्‍यांचे कुटुंबिय आहेत. त्यांच्या संपर्कातील इतरांचे स्वॅब आज (दि.8) घेण्यात येणार आहेत.
     आष्टी तालुक्यात देवीलिमगाव येथील कोरोनाबाधित आढळून आलेला 4 वर्षीय मुलगा तर 8 वर्षीय मुलीचे आई-वडिल औरंगाबाद येथे पॉझिटिव्ह आढळून आलेे होते. त्यांच्यावर उपचार सुरु असल्यामुळे मुलांना मामाच्या गावी देवीलिमगाव येथे पाठविले होते. त्याठिकाणी जाऊन आरोग्य विभागाने स्वॅब घेतले, ते पॉझिटिव्ह आढळून आहेत. त्यांचे मुळ गाव आष्टी तालुक्यातील टाकळी अमेया असून त्यांचा गावाशी संपर्क आला नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
    अंबाजोगाई येथील सिराज कॉलनीतील 38 वर्षीय पु. अलिबागवरुन आलेल्या बाधिताच्या संपर्कात आलेला होता. तर शहरातील सातपुते गल्ली येथील 30 वर्षीय पुरुष पुणे येथून आलेले आहे. तसेच केकानवाडी (ता. केज) येथील 22 वर्षीय मुलगा किर्गीस्थान येथून परतलेला आहे. हे तिघे पॉझिटिव्ह आहेत. तर 273 निगेटिव्ह व 2 अहवाल अनिर्णित आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, एकाच दिवशी 13 रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
READ KARYARAMBH E PAPER

Tagged