corona

चिंताजनक : 383 पॉझिटिव्ह; एसपी ऑफिसमधील 12 जणांना बाधा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीडमध्ये 119 तर अंबाजोगाईत कोरोनाचे शतक
बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 383 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 119 अंबाजोगाई कोरोनाचे शतक झाले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 2 हजार 605 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 383 जण पॉझिटिव्ह तर 2 हजार 222 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 119 तर अंबाजोगाई 100, आष्टी 30, धारूर 10, गेवराई 21, केज 28, माजलगाव 27, परळी 33, पाटोदा 9 तर वडवणी 6 असे रूग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, पोलीस अधीक्षक कार्यालयातील 12 कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली असून जिल्हा कारागृह, रूग्णालयातील कर्मचारी, व्यापार्‍यांसह शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

2
7
9
Tagged