माजलगाव दि.9 : येथील ‘परिवर्तन’ मल्टीस्टेच्या माध्यमातून ठेवीदारांना कोट्यावधींचा गंडा घालणारा मुख्य आरोपी विजय आलझेंडे अखेर मंगळवारी (दि.9) माजलगावच्या न्यायालयासमोर शरण आला. विजय आलझेंडेवर गैरव्यवहार प्रकरणी 11 गुन्हे दाखल आहेत. मागील अडीच वर्षापासून आलझेंडे पोलीसांना गुंगारा देत होता.
विजय आलझेंडेवर परिवर्तन मल्टीस्टेट मधील सुमारे 50 कोटीच्या घोटाळयात 11 गुन्हे दाखल आहेत. सुरुवातील शिक्षक त्यानंतर नगरसेवक झालेला विजय आलझेंडे हा परिवर्तनचा अध्यक्ष होता. अधीकच्या व्याजाचे अमिष दाखवून आलझेंडे यांने अनेकांची फसवणुक केली होती. त्यावर 11 गुन्हे दाखल झाल्यापासून तब्बल अडीच वर्षांपासून आलझेंडे फरार होता. मागील आठवड्यापासून आर्थीक गुन्हे शाखेचे पथक सपोनि.सुजीत बडे यांच्या नेतृत्वात आलझेंडेच्या मागावर होते. या पार्श्वभूमीवर आलझेंडेंने मंगळवारी माजलगावच्या न्यायालयात शरणागती पत्करली आहे.