BEED CIVIL HOSPITAL

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 1719 रुग्णांना डिस्चार्ज

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.20 : बीड जिल्ह्यातील 3203 रुग्णांपैकी आतापर्यंत 1719 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याही 1409 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.

बीड जिल्ह्यात आतापर्यत 3203 रुग्णांची कोरोना पॉझिटिव्ह म्हणून नोंद झालेली आहे. तर 79 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील चार जणांची नोंद इतर जिल्ह्याच्या पोर्टलवर झालेली आहे. रुग्ण दुरुस्त होण्याचा दा 53.66 टक्क्यांवर पोहोचल्याचे कुंभार यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात या महिन्यात स्वॅब तपासणी आणि अ‍ॅन्टीजेन टेस्टचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. आतापर्यंत 46 हजार 555 जणांचा तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यात 43 हजार 352 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. उपचाराखाली असलेल्या रुग्णांमध्ये अहमदनगरमध्ये 4, औरंगाबादेत 2, मुंबईत 3, पुण्यात 1, चिंचवड 1, केईएम मुंबई 1, ज्युपिटर हॉस्पिटल पुणे 2, रुबी हॉस्पिटल पुणे 1, हेडगेवार हॉस्पिटल औरंगाबाद 1, अपेक्स हॉस्पिटल 1 एमजीएम हॉस्पिटल औरंगाबाद 1, एकविरा हॉस्पिटल औरंगाबाद 1, सीटी केअर हॉस्पिटल औरंगाबाद 1, लाईफलाईन हॉस्पिटल औरंगाबाद 1 या ठिकाणी उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर काही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अनेकांना लक्षणे नसल्याने त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

Tagged