kirana dukan

किराणा दुकाने उघडण्यास परवानगी

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.20 : दोन दिवसांनी सुरु होणार्‍या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, बीड, आष्टी या सहा शहरातील किराणे दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी रेखावार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, गणेश मुर्तीची दुकाने, किराणा दुकाने, फळे, भाजीपाला, दूध, मेडिकल, पुजेच्या साहित्याची दुकाने, हार फुलांची दुकाने व त्यांची घाऊक व किरकोळ दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. परंतु असे असले तरी मिठाई, हॉटेल, रेस्टॉरंट, सुशोभीकरण साहित्याची दुकाने यांना दुकाने उघडण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच सर्व व्यापार्‍यांनी अ‍ॅन्टीजेन टेस्ट करून घ्याव्यात असेही अवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. दरम्यान जिल्हाधिकार्‍यांचे हे आदेश लगेचच लागू झालेले आहेत.

अ‍ॅन्टीजेन टेस्ट केली की नाही? हे ओळखायचे कसे?
ज्या व्यापार्‍यांनी अ‍ॅन्टीजेन टेस्ट केली त्यांनाच दुकाने उघडण्यास परवानगी असेल असे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी यापुर्वीच्या आदेशात म्हटले आहे. आजपासून दुकाने उघडण्यास सुरुवात होईल, त्यावेळी कुठल्या व्यापार्‍यांनी टेस्ट केली किंवा नाही केली हे कोण ठरविणार? टेस्ट न करता त्याने दुकान उघडलेले असेल तर त्याच्यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार? अशी कारवाई कोणी करायला हवी? दुकानदारांना तपासणी केली की नाही याची शहनिशा करण्यास अधिकारी आलेच तर त्यांना टेस्ट केल्याचा कुठला पुरावा व्यापार्‍यांनी दाखवावा? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. ज्यांनी टेस्ट करण्यास नकार दिला त्यांना दुकाने उघडण्यास जिल्हाधिकार्‍यांनी मज्जाव करावा, अशी मागणी व्यापार्‍यामधून होत आहे.

Tagged